scorecardresearch

Premium

‘सत्यशोधक’ ५ जानेवारीला प्रदर्शित होणार

महात्मा जोतिरावांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होते आहे.

Satyashodak movie will release on January 5 Entertainment
‘सत्यशोधक’ ५ जानेवारीला प्रदर्शित होणार ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वत: या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे पहिलेवहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित करण्यात आले आहे. या पोस्टरवर महात्मा जोतिराव फुले यांच्या भूमिकेत अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी लक्ष वेधून घेतले आहे. नवीन वर्षांत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत त्याच्याच आसपास ५ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. 

महात्मा जोतिरावांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या संदीप कुलकर्णी यांच्या लूकची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत होते आहे. वेशभूषा आणि रंगभूषा अगदी योग्य जमून आल्याने खरेच महात्मा जोतिराव फुले समोर आहेत की काय असा भास होतो. त्यामुळे अभिनेत्याची योग्य निवड आणि लूकचा संपूर्ण अभ्यास करूनच ही भूमिका साकारली गेल्याचे स्पष्ट होत आहे. ‘विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली..’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या  जोतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठय़ा पडद्यावर पहिल्यांदाच येणार आहे. अभिनेते संदीप कुलकर्णीसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकणार आहेत.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Dhasal movie
नामदेव ढसाळ यांचा जीवनावर आधारित चित्रपट येणार; त्यांच्या पत्नी म्हणाल्या, “त्यांचं समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन अन्..”
ulhasnagar bjp mla ganpat gaikwad, ulhasnagar firing case marathi news
VIDEO : आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचे सीसीटीव्ही चित्रण आले समोर
sadhu meher passes away at mumbai residence
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते साधू मेहर यांचे निधन

हेही वाचा >>>शाहरुखच्या बहुचर्चित ‘डंकी’चे बजेट माहितेय का? चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केले ‘फक्त’ एवढे रुपये

या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. इंग्लंडमधील पेन्झान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बायोग्राफीकल फिचर फिल्म या पुरस्काराने तर, जर्मनीत होहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सन्मान या चित्रपटाला मिळाला आहे.  समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि नीलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित, संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत. रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Satyashodak movie will release on january 5 entertainment amy

First published on: 26-11-2023 at 02:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×