scorecardresearch

सोहेल खानसोबत घटस्फोट घेतल्यानतंर सीमा खानने उचलले महत्त्वाचे पाऊल

आता नुकतंच सीमा हिने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Seema Khan Sohail khan

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या २४ वर्षानंतर ते दोघेही घटस्फोट घेत आहेत. यामुळे सर्वांनाचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आता नुकतंच सीमा हिने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये मोठा बदल केला आहे.

सीमा खान ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आण व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोहेल खानसोबत लग्न झाल्यानंतर सीमाने इन्स्टाग्रामवर फक्त सीमा हेच नाव ठेवले होते. मात्र त्यानंतर काही वर्षांनी तिने त्या नावात बदल करत सीमा खान असे केले होते.

‘अजान’ नंतर सोनू निगमचं आणखी एक वादग्रस्त विधान, म्हणाला “नवरात्रीत मटण बंदी….”

यानंतर आता सोहेल खानसोबत घटस्फोट होत असल्याच्या कारणानंतर तिने इन्स्टाग्रामवरील नावात पुन्हा एकदा बदल केला आहे. यात तिने तिच्या नावापुढील खान हे आडनाव हटवले आहे. त्याऐवजी तिने ‘सीमा किरण सचदेव’ असे नाव इन्स्टाग्रामवर ठेवले आहे.

“आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित

सोहेल खान आणि सीमा खान १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. सीमा आणि सोहेल यांची पहिली भेट अभिनेता चंकी पांडे याच्या साखरपुड्यादरम्यान झाली होती. सोहेल आणि सीमा या दोघांचाही धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नावेळी बऱ्याच अडचणी आल्या होत्या. मात्र आता लग्नाच्या २४ वर्षानंतर त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Seema khan changes her name on instagram after divorce from sohail khan nrp

ताज्या बातम्या