OTT Releases This Week : सप्टेंबरचा पहिला आठवडा सिनेप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. अनेक नवीन उत्तम चित्रपट आणि जबरदस्त वेब सीरिज ओटीटीवर येण्यास सज्ज आहेत. त्यात रोमान्स, कॉमेडीपासून ते अॅक्शनपर्यंतचे अनुभव पाहायला मिळतील. या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट व सीरिज तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या आठवड्यात ओटीटीवर नवीन काय पाहायला मिळणार? ते जाणून घेऊयात.
आंखों की गुस्ताखियां
विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर यांचा चित्रपट ‘आंखों की गुस्ताखियां’ चित्रपटगृहांनंतर आता ओटीटीवर येत आहे. या रोमँटिक चित्रपटातून शनाया कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता हा चित्रपट 5 सप्टेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर तुम्ही पाहू शकता.
मालिक
राजकुमार रावचा क्राईम-थ्रिलर चित्रपट ‘मालिक’ देखील ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. मालिक ५ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल. मानुषी छिल्लर राजकुमार रावबरोबर या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आहे.
इन्स्पेक्टर झेंडे
इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट ५ सप्टेंबरपासून ओटीटीवर येईल. मनोज बाजपेयी अभिनित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जिम सर्भ देखील दिसणार आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी पोलिसाची भूमिका साकारणार आहेत.
द पेपर
अमेरिकन सिटकॉम ‘द पेपर’ ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. डोम्हनॉल ग्लीसन आणि सबरीना इम्पाशियटोर अभिनीत ही सीरिज तुम्हाला जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
ज्युनियर
कीर्ती रेड्डी आणि श्रीलीला यांचा कन्नड-तेलुगु चित्रपट ‘ज्युनियर’ देखील ओटीटी स्ट्रीमिंगसाठी सज्ज आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडीओमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जिनिलीया देशमुख देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.
वेन्सडे सीझन २ पार्ट २
‘वेन्सडे सीझन २’ ही एक हॉरर सीरिज आहे ज्याचे एकूण ६ भाग आहेत. मालिकेचा पहिला भाग ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि आता दुसरा भाग सप्टेंबरमध्ये येईल. तुम्हाला ३ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर ‘वेन्सडे सीझन २’ चा दुसरा भाग पाहता येईल.