जावेद अख्तर यांना ट्रोल करणाऱ्यांना शबाना आझमींनी दिलं ‘हे’ उत्तर, शशी थरूर यांच्या गाण्यावर केली होती कमेंट

काही दिवसांपूर्वीच शशी शरूर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ते किशोर कुमार याचं गाण गाताना दिसत आहेत.

javed-akhtar-shahi-tarur-4
(Photo: Instagram/ Shabana Azmi, Twitter/ Shashi Tharoor)

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी आणि त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतीच जावेद अख्तर यांनी शशी थरुरु यांच्या एका व्हिडीओवर कमेंट केली होती. या कमेंटमुळे अनेकांनी जावेद अख्तर यांना ट्रोल केलं होतं. अखेर शबाना आझमी यांनी एक ट्वीट करत ट्रोल करणाऱ्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. शशी थरुर आणि जावेद अख्तर चांगले मित्र असल्याचं म्हणत शबाना आझमी यांनी ट्रोल करणाऱ्यांनी गैरसमज केल्याचं म्हंटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच शशी शरूर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी किशोर कुमार याचं लोकप्रिय ठरलेलं ‘एक अजनबी’ हे गाणं गायलं होतं. श्रीनगरमधील एका सांस्कृतीक कार्यक्रमात त्यांनी हे गाणं गायलं होतं. त्याच्या या गाण्याच्या व्हिडीओवर गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांची थट्टा करत एक ट्वीट केलं होतं. जावेद अख्तर ट्वीटमध्ये म्हणाले होते, “व्वा… आमच्याकडे हिंदीही साधारण एक असचं गाणं आहे.”

हे देखील वाचा: अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक; अरुणा भाटिया काळाच्या पडद्याआड

तर जावेद अख्तर यांनी केलेली कमेंट अनेक नेटकऱ्यांना खटकली. एक युजर म्हणाला, “जावेद अख्तर मला माहितेय तुम्ही मजेत म्हणालात, मात्र तुमचं हे बोलणं योग्य नाही.” तर आणखी एक युजर म्हणाला, “असं वाटतं शशी थरुर यांनी कोणत्यातरी गोष्टीत अख्तर यांना सपोर्ट केलेला नाही.” ट्रोलर्सच्या या कमेंटनंतर शबाना आझमी यांनी एक ट्वीट केलंय. यात त्या म्हणाल्या, “आणि सर्व ट्रोल करणाऱ्यांनो जस्ट चील…शशी थरुर एक चांगले मित्र आहेत आणि जावेद अख्तर यांची कमेंट ही एक फक्त विनोद होती.” असं त्या म्हणाल्या आहेत.

या आधी एका ट्वीटमध्ये शबाना आझमी यांनी शशी थरुर यांच्या गाण्याचं कौतुक केलं होतं. जावेद अख्तर यांना सपोर्ट करण्याची शबाना आझमी यांची ही पहिली वेळ नव्हे. या आधीदेखील काही वेळा ट्रोल करणाऱ्यांना शबाना आझमी यांनी उत्तर दिलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shabana azmi defends javed akhtar commenting on shashi tharoor video goes viral kpw

ताज्या बातम्या