बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा काल म्हणजे २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. त्याचा हा बर्थडे थोडा जास्तचं विशेष होता. कारण वाढदिवसाच्या काही दिवसांआधीच त्याचा मोठा मुलगा आर्यनचा सुटका मिळाली आणि तो मन्नतवर परतला होता. शाहरुखला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे शाहरुखची मुलगी सुहाना खानच्या पोस्टने वेधले आहे.

सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सुहाना आणि शाहरुख दिसत आहेत. सुहानाचा हा बालपणीचा फोटो आहे. हा फोटो शेअर करत सुहानाने शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

आणखी वाचा : “तुला लाज वाटायला हवी मुस्लीम असून…”, केदारनाथचे दर्शन घेतल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत जगातील सगळ्यात उंच बिल्डींग बूर्ज खलीफावरून शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने काल त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला आहे.