अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्रूझवरील पार्टीप्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर गुरुवारी जामीन मंजूर केला. परंतु, जामिनाच्या अटींबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची शुक्रवारी किंवा शनिवारी सुटका होऊ शकेल. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज र्मचट व मुनमुन धमेचा यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर आर्यनची छोटी बहीण सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भावासाठी एक खास पोस्ट केली आहे.

सुहाना खान सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. तशी सुहाना सोशल मीडियावर फार आधीपासून आहे तरी तिने काही महिन्यांपूर्वीच या खात्याला सार्वजनिक केलं आहे. ती तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते. न्यायालयाने आर्यनला जामीन मंजूर केल्यानंतर सुहानाने भावाबद्दलचं प्रेम इन्स्टाग्रामवरुन व्यक्त केलं आहे. सुहानाने एक फोटो कोलाज पोस्ट केलं असून त्यामध्ये आर्यन आणि तिच्या बालपणीचे चार फोटो दिसत असून या फोटोंमध्ये शाहरुखही त्यांच्यासोबत आहे. फोटोमध्ये छोटा आर्यन आणि सुहाना एकमेकांशी मस्ती करताना दिसत असून शाहरुख सोबत खेळताना दिसत आहेत. या फोटोला सुहानाने अवघ्या तीन शब्दांची कॅप्शन दिली आहे. आय लव्ह यू असं सुहाना हा फोटो शेअर करत म्हटली आहे. या फोटोला साडेचार लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

सुहानाच्या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स येतात. मात्र आता तिला भाऊ आर्यनच्या अटकेनंतर अनेकजण सोशल मीडियावर सुहानालाही ट्रोल करु लागले. यामुळे सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सेटींगमध्ये बदल केले आहेत. तिने तिच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणीही आपल्या पोस्टवर ट्रोलिंग करुन त्रास देऊ नये, नकारात्मक प्रतिक्रिया देऊन टार्गेट करु नये या हेतूने तिने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सुहाना परदेशात शिक्षण घेत आहे. शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. यापैकी आर्यन वयाने सर्वात मोठा असून अबराम आठ वर्षांचा आहे.