‘रईस’ या आपल्या आगामी चित्रपटात बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सनी लिओनीबरोबर ठुमका लावताना दिसणार आहे. ८० च्या दशकातील गाजलेले ‘लैला ओ लैला’ हे गाणे रईसमध्ये शाहरुख आणि सनीवर चित्रित करण्यात येणार आहे. मूळ स्वरूपातील हे गाणे फिरोज खान आणि झीनत अमानवर चित्रित करण्यात आले होते. चित्रपटात जुन्या जमान्यातल्या गाण्याची आवशकता असल्याने ‘रईस’च्या निर्मात्यांनी ‘लैला ओ लैला’ गाण्याची निवड केल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत निर्मात्यांनी शाहरुखशी संवाद साधला असता या गाण्यावर नृत्य करण्यासाठी सनी लिओनीला घेण्याचा सल्ला त्याने निर्मात्यांना दिला. चित्रपटाचे निर्माता फरहान अख्तर आणि रितेशने अमित-कुमार कांचनकडून गाण्याचे अधिकार खरेदी केले असून, गाण्याचे पुनर्मुद्रण करून अधीक जलद स्वरूपात हे गाणे सादर करण्यात येणार आहे. मुंबईत चित्रित होणाऱ्या या गाण्यासाठीचा सराव सुरु झाला आहे. सनी पुढील महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात करून केवळ दोन दिवसांत गाण्याचे शूटिंग संपविणार असल्याचे सूत्रांकडून समजले. चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान शाहरुखच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. राहुल ढोलकियाचे दिग्दर्शन असलेला ‘रईस’ या वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
सनी लिओनी आमीर आधी दिसणार शाहरुख खानबरोबर!
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सनी लिओनीबरोबर ठुमका लावताना दिसणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 18-03-2016 at 19:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan sunny leone to share screen space in raees