शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘रईस’ यावर्षीऐवजी आता २०१७मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे कळते.
शाहरुख आणि पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानची प्रमुख भूमिका असलेला ‘रईस’ हा चित्रपट यावर्षी ३ जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र, ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणारा सलमानच्या ‘सुल्तान’शी सामना करावा लागू नये म्हणून शाहरुखने आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याचे कळते. तसेच, ख्रिसमच्या मुहुर्तावर आमिरचा ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित होतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुखला त्याचा हा चित्रपट सण किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित करण्याची इच्छा आहे. जेणेकरून ‘रईस’ बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त कमाई करू शकेल. पण, ‘रईस’ चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार ही केवळ अफवा आहे. कारण, या दिवशी हृतिक रोशनची निर्मिती असलेला ‘काबील’ चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाहरुख आता आपल्या चित्रपटासाठी नक्की कोणती तारीख निवडतो ते लवकरचं कळेल. नाहीतर या चित्रपटाची हालतही ‘दिलवाले’ चित्रपटासारखी होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2016 रोजी प्रकाशित
आमिर आणि सलमानला शाहरुख घाबरला; ‘रईस’ची तारीख ढकलली पुढे
'रईस' हा चित्रपट यावर्षी ३ जुलैला प्रदर्शित होणार होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 26-04-2016 at 11:13 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans raees release to be pushed to