scorecardresearch

शाहिद कपूरचा कुटुंबियांसह वरळीच्या घरामध्ये गृहप्रवेश, इतक्या कोटी रुपयांना खरेदी केलं अलिशान घर

शाहिद कपूर व मीरा राजपूत यांच्या नव्या घराबाबत सध्या चर्चा रंगत आहे. बॉलिवूडचं हे सेलिब्रिटी कपलने नव्या घरी गृहप्रवेश केला आहे.

शाहिद कपूरचा कुटुंबियांसह वरळीच्या घरामध्ये गृहप्रवेश, इतक्या कोटी रुपयांना खरेदी केलं अलिशान घर
शाहिद कपूर व मीरा राजपूत यांच्या नव्या घराबाबत सध्या चर्चा रंगत आहे. बॉलिवूडचं हे सेलिब्रिटी कपलने नव्या घरी गृहप्रवेश केला आहे.

बॉलिवूडमधील बहुचर्चित कपलमधील एक जोडपं म्हणजे शाहिद कपूर व मीरा राजपूत. शाहिद-मीराची लाइफस्टाइल, त्यांचं राहणीमान नेहमीच चर्चेत असतं. जुहू येथे शाहिदचं अलिशान घर आहे. आता तो आपल्या कुटुंबासह आपल्या नव्या घरामध्ये राहण्यासाठी गेला आहे. शाहिदने मुंबईमधील वरळी परिसरात घर खरेदी केलं होतं. आता वरळीमधील अलिशान घरामध्ये शाहिदने प्रवेश केला आहे.

आणखी वाचा – Video : आजीला अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडली महेश बाबूची लेक, आईला मिठी मारली अन्…

२०१८मध्ये शाहिद-मीराने वरळी परिसरात ५८ कोटी रुपयांचं घर खरेदी केलं होतं. मात्र करोना काळामध्ये कपूर कुटुंबीय आपल्या नव्या घरामध्ये राहण्यासाठी जाऊ शकलं नाही. पण आता नवरात्रीनिमित्त शाहिदने नव्या घरामध्ये गृह प्रवेश केला आहे. ‘पिंकविला’ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद व मीरा आपल्या मुलांसह पाच दिवसांपूर्वीच नव्या घरामध्ये राहण्यासाठी गेले आहेत.

नव्या घरी राहायला जाण्यापूर्वीच शाहिद-मीराने घरगुती पूजा केली. तसेच दोघांनी मिळून आपल्या घराचं इंटेरियर उत्तम पद्धतीने केलं आहे. करोनामुळे शाहिदच्या घराच्या इंटेरियरचं काम लांबणीवर गेलं होतं. शाहिदला गाड्यांचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच पार्किंगमध्येही त्याच्या गाडी पार्किंगसाठी सहा जागा राखीव आहेत. शाहिद-मीराच्या या घराला ५०० स्क्वेअर फुटची बाल्कनी आहे.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

लग्नापूर्वीच शाहिदने जुहू येथील घर खरेदी केलं होतं. जुहू येथील त्याचं घर समुद्रकिनारीचं होतं. जुहू बीचवरील गर्दी शाहिदच्या घरामधून दिसत होती. पण बीचवरील या सगळ्या दृश्यांपासून आपल्या मुलांना लांब ठेवलं पाहिजे या हेतूने शाहिद वरळीच्या घरामध्ये राहण्यासाठी गेला असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या