scorecardresearch

“मला ते आवडणार नाही…”, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया

येत्या १७ एप्रिलला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु आहे. विकी कौशल-कतरिना कैफ, फरहान अख्तर-शिबानी दांडेकर पाठोपाठ आता आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. येत्या १७ एप्रिलला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुकतंच आलिया आणि रणबीरच्या लग्नावरुन अभिनेता शाहिद कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांचे लग्न मुंबईत पार पडणार आहे. या लग्नासाठी त्यांनी कोणतंही फाइव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आलेले नाही. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबियांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेणार आहेत. या लग्नाच्या विविध सोहळ्यांना १३ एप्रिलला सुरुवात होणार असून १७ एप्रिलला ते दोघेही सप्तपदी घेणार आहेत, असे बोललं जात आहे.

“हृतिक रोशन आणि सुझान खानला पुन्हा त्यांचे प्रेम मिळाल्याचा मला आनंद”, प्रसिद्ध अभिनेत्रीचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

नुकतंच जर्सी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता शाहिद कपूरला आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने फार कमी शब्दात प्रतिक्रिया दिली. ‘आलिया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, तू तिला काय सल्ला देशील?’ असा प्रश्न यावेळी शाहिदला विचारण्यात आला होता.

त्यावर तो म्हणाला, “जोपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही. तोपर्यंत मी यावर कोणतेही भाष्य करणार नाही. रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल सध्या मीडियामध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे याबाबत काहीही बोलणं मला आवडणार नाही.”

दरम्यान आलिया आणि शाहिद दोघेही एकमेकांचा फार चांगले मित्र आहेत. त्या दोघांचे मैत्रीचे बॉन्डिंग फार चांगले आहे. या दोघांनी आतापर्यंत एकत्र दोन चित्रपटात काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या उडता पंजाबमध्ये ते दोघेही एकत्र झळकले होते. त्यापूर्वी त्यांनी शानदार या चित्रपटात काम केले आहे.

“मला गरज नाही…”, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या प्रश्नावर महेश बाबूने दिले उत्तर

शाहिद कपूर हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’चे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या तेलगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. यात शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसत आहे. यात मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही भूमिका पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahid kapoor reaction on alia bhatt and ranbir kapoor wedding he says i refrain to comment till there is an official announcement nrp

ताज्या बातम्या