शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची मुलगी मिशा सध्या चर्चेत आली आहे. आणि कारण आहे तिची फोटोग्राफी! मिशाची आई मीराने काही फोटो शेअर केले आहेत जे मिशाने काढलेले आहेत.
मीराने हे फोटो शेअर करताना कॅप्शनही दिलं आहे. ती म्हणते, “मिशा खरंच या बाबतीत चांगली आहे. आणि त्यामुळे मला तिची आई म्हणून अभिमान वाटत आहे की ती तिचा छंद जोपासत आहे.” मीराने स्वतःचा पांढऱ्या टॉप आणि त्याला मॅचिंग पँट घातलेला फोटो शेअर केला आहे. हा सुंदर फोटो मिशाने काढलेला आहे. मीराच्या गॉगल्सने तिचा लूक पूर्ण होत आहे.
View this post on Instagram
या पोस्टचा शेवट करताना मीरा म्हणते, “मी तुझ्यासोबत आणि तुझ्या पाठीशी कायम उभी असेन.” मीराने इतरही काही फोटो आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, जे मिशाने काढलेले आहेत. या फोटोंवरुन मिशाचे फोटोग्राफी स्किल्स चांगलेच विकसित झाल्याचं दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मीराने तिचा लहान मुलगा झैनबद्दलही पोस्ट शेअर केली आहे. मीराच्या मेकअपचा स्पंज झैनने कशा पद्धतीने खराब केला, तेही तिने दाखवलं आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “तुमच्यापैकी कोणासोबत हे होतं का की मी एकटीच अशी आहे?”
मीरा राजपूत आणि शाहिद कपूर हे दोघे २०१५मध्ये लग्नबंधनात अडकले. २०१६मध्ये त्यांची मुलगी मिशाचा जन्म झाला तर २०१८ मध्ये झैनचा जन्म झाला आहे.