Video : आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी

तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे

मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर अखेर आज त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तब्बल २६ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे. आर्यनला नेण्यासाठी शाहरुख खान जेलबाहेर उपस्थित होता. आर्यन खान मन्नतवर पोहोचताच त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे.

शुक्रवारी, न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला आणखी एक रात्र मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. मात्र, आज शनिवारी तो तुरुंगातून बाहेर आला. ढोल-ताशा वाजवत आर्यनच्या स्वागतासाठी चाहते मन्नतवर उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shahruk son aryan khan bail crowed out side mannat

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या