scorecardresearch

VIDEO : …अन् पार्टीमध्ये बेधूंद होऊन नाचत राहिला शाहरुख खान, अभिनेत्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ चर्चेत

दिग्दर्शक करण जोहरच्या ५० व्या बर्थ डे पार्टीला किंग खान शाहरुख भलताच भाव खाऊन गेला. यादरम्यानचा शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Karan Johar, Shahrukh Khan
दिग्दर्शक करण जोहरच्या ५० व्या बर्थ डे पार्टीला किंग खान शाहरुख भलताच भाव खाऊन गेला. यादरम्यानचा शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

किंग खान शाहरुख सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. शाहरुख बी-टाऊनमधील अनेक पार्ट्यांना देखील आवर्जून हजेरी लावतो. यादरम्यानचे त्याचे बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली पार्टी म्हणजे दिग्दर्शक करण जोहरचा ५०वा वाढदिवस. करणने आयोजित केलेल्या बर्थ डे पार्टीला चंदेरी दुनियेतील सगळीच मंडळी हजर होती. या पार्टीदरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यामध्ये शाहरुखचा डान्स करतानाच व्हिडीओ देखील समोर आला आहे.

करणने आयोजित केलेल्या पार्टीला बॉलिवूडमधील मंडळी अगदी नटून थटून आली होती. करणने त्याच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं. पण या पार्टीमध्ये शाहरुख भलताच भाव खाऊन गेला. शाहरुख या पार्टीमध्ये त्याच्याच ‘कोई मिल गया’ गाण्यावर बेधूंद होऊन नाचत होता. याचदरम्यानचा शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – सोनाली कुलकर्णीने सासरी पहिल्यांदाच बनवला गोड पदार्थ, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

‘कोई मिल गया’ गाणं लागताच शाहरुख डान्स करू लागतो. त्याला डान्स करताना पाहून उपस्थितही त्याच्याकडे एकटक पाहत राहतात. तसेच बॉलिवूडमधील इतर मंडळीदेखील त्याच्यासोबत नाचत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्याच्या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची देखील बरीच पसंती मिळाली आहे.

आणखी वाचा – ठरलं तर! ‘रानबाजार’चे पुढील भाग ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, प्रेक्षकांची मिळतेय पसंती

या पार्टीला शाहरुखबरोबरच त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान देखील उपस्थित होता. गौरीने यावेळी सोनेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तसेच कॅमेऱ्यासमोर तिने फोटोसाठी विविध पोझ देखील दिल्या. बॉलिवूडकरांनी या पार्टीला अगदी पुरेपूर एण्जॉय केलं. शाहरुखचा डान्स तर उपस्थितांना आश्चर्यचकित करणारा होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahrukh khan dance video from karan johar birthday party viral on social media kmd

ताज्या बातम्या