बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लवकरच तिचा ‘मॅट्रिक्स ४’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांकाने वयाच्या १७व्या वर्षी अभिनयच्या करिअरला सुरुवात केली. २०००मध्ये प्रियांकाने मिस इंडिया किताब जिंकला. तेव्हाचा प्रियांकाचा एक जून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान तिला लग्नासंबंधी प्रश्न विचारताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ प्रियांकाच्या मिस इंडिया कॉम्पिडीशनच्या वेळचा आहे. या कॉम्पिडीशनमध्ये शाहरुख खान तेथे परिक्षक म्हणून उपस्थित असतो. दरम्यान तो प्रियांकाला एक कठिण प्रश्न विचारताना दिसतो.
आणखी वाचा : नुसरत जहाँ यांच्या मुलाचे वडील कोण? जन्मदाखला आला समोर
खेळाडू, उद्योगपती आणि हिंदी फिल्म स्टार यांचे पर्याय देत शाहरुख प्रियांकाला विचारतो, ‘तु कोणाशी लग्न करशील? एक लोकप्रिय खेळाडू ज्याने अनेक विक्रम करत देशाचे नाव मोठे केले आहे. जसं की इथे उपस्थित असलेले अझर किंवा एखादा उद्योगपती ज्याचे नाव Swarovski जे उच्चारणे देखील कठिण असेल. जो तुला दागिन्यांनी सजवेल किंवा माझ्यासारखा एखादा हिंदी फिल्म स्टार जो तुला असे कठिण प्रश्न विचारेल.’
View this post on Instagram
नंतर शाहरुख मजेशीर अंदाजात जर तु माझे नाव घेतले तर अझर आणि Swarovski यांना वाईट नाही वाटणार असे म्हटले आहे. पण प्रियांकाने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली होती. ‘हा थोडा कठिण प्रश्न आहे. पण मी याचे उत्तर देऊ इच्छिते असे प्रियांका म्हणते. ‘मी भारताला अभिमान असणाऱ्या खेळाडूची निवड करेन. त्याला माझा नेहमी पाठिंबा असेल. तसेच देशाला जितका त्याचा अभिमान असेल तितकाच मला ही असेल. जर तो देशाचा अभिमान असेल तर जगातील बेस्ट पती असेल’ असे तिने म्हटले आहे.
प्रियांका लवकरच फरहान अख्कर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील असणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका ‘मॅट्रिक्स ४’, ‘टेक्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ यात देखील काम करणार आहे.