बॉलिवूड कलाकार हे बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतात. कधीकधी त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण कलाकार देखील शांत बसत नाहीत. ते ट्रोलर्सला सुनावत असल्याचे पाहायला मिळते. असेच काहीसे बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत घडले आहे.

शाहरुखने चाहत्यांशी गप्पा मारण्यासाठी १५ मिनिटांचे प्रश्न-उत्तर असे ट्विटरवर एक सेशन ठेवले होते. ‘माझ्याकडे १५ मिनिटांचा वेळ आहे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला विचारा’ असे म्हणत शाहरुखने ट्वीट केले होते. त्याच्या या ट्वीटला रिट्वीट कर चाहत्यांनी शाहरुखवर प्रश्नांचा वर्षाव केला. काहींनी त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल विचारलं तर काहींनी खासगी आयुष्याबद्दल.

आणखी वाचा : KRKने घेतला SRKशी पंगा! प्रदर्शनापूर्वीच ‘पठाण’ची कथा ट्विटरवर केली लिक

दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला चक्क त्याच्या अंतर्वस्त्राचा रंग कोणता आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने उत्तर देत त्या चाहत्याला सुनावले. ‘मी #AskSRK हे सेशन केवळ अशाच उत्कृष्ट आणि शिकण्यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ठेवले होते’ असे शाहरुखने म्हटले आहे.

जवळपास दोन वर्षांनंतर शाहरुख पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि जॉन अब्राहम ही जोडी पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.