गणेशोत्सवात अबरामचा गणपती बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे शाहरूख झाला होता ट्रोल

दरवर्षी शाहरुख त्याच्या घरी गणेश चतुर्थी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

shahrukh khan, ganesh chaturthi, abram,
दरवर्षी शाहरुख त्याच्या घरी गणेश चतुर्थी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे सर्व सण उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात, मग ते कोणत्याही धर्माचे असो. या सेलिब्रिटींना बऱ्याच वेळा त्यांच्या धर्मावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं. आज देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पावर ज्यांची भक्ती आणि श्रद्धा आहे ते गणपतीची पूजा करतात. त्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान ते भाईजान सलमान खानपर्यंत अनेक कलाकार आहेत ज्यांचा बाप्पावर पूर्ण विश्वास आहे. मात्र, काही कट्टरपंथी लोक असतात ज्यांना हे आवडत नाही. एकदा तर काही नेटकऱ्यांनी शाहरूखला गणेशोत्सव साजरा केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले होते.

शाहरूखच्या घरी होळी, दिवाळी, गणेशोत्सव ते ईद आणि रमजान पर्यंत सगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. शाहरूख सोशल मीडियावर सक्रिय असून कोणताही सण असला की तो सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा देताना दिसतो. एकदा शाहरुखला काही कट्टरपंथी लोकांनी गणेशोत्सव साजरा केल्यामुळे ट्रोल केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरूखने एकदा गणेशोत्सवा निमित्त बाप्पाला आपल्या घरी आणले होते. तर त्यावेळी शाहरुखने त्याचा धाकटा मुलगा अबरामचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत अबराम गणपतीची पूजा करत असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत ‘आमचे गणपती पप्पा, घरी आले आहेत, माझा छोटा मुलगा त्यांना याच नावाने हाक मारतो,’ अशा आशयाचे कॅप्शन शाहरुखने त्या फोटोला दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

अबरामचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी शाहरुख सगळ्या धर्मांचा आदर करतो हे बोलत त्याची स्तुती केली होती. तर काही नेटकऱ्यांनी शाहरूखला मुस्लीम असताना हिंदू देवताची पूजा केली म्हणून ट्रोल करत होते.

आणखी वाचा : ‘मला पुन्हा त्याचा चेहरा पाहायचा नाही…’, कृष्णा अभिषेकवर संतापली गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा

बऱ्याच लोकांनी शाहरुखला ‘तू पाप करत आहेस’, असे म्हटले आहे. तर ‘तू हे चुकीच करत आहेस’, असे सांगितले. शाहरुखला नेटकऱ्यांनी कितीही ट्रोल केले तरी तो दरवर्षी गणेश चतुर्थी साजरा करतो. दरम्यान, एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते की, ‘तो लहान असताना एका रिफ्युजी कॉलोनीमध्ये राहत होता. तिथे रामलीला आणि ईद एकत्र साजरी केली जात असे. त्यामुळे त्याने त्याच्या मुलांवर एक विशिष्ट धर्माचे पालन करण्यासाठी कधीही दबाव आणला नाही. ते त्यांना पाहिजे त्या धर्माचे पालन करू शकतात.’

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shahrukh khan when trolled for sharing abram photo praying ganesha on ganesh chaturthi dcp