अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान रविवारी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ, टेलिव्हिजन अभिनेता करण टॅकर आणि इतर मित्रांसमवेत पार्टी करताना दिसला. पार्टीचे फोटो अभिनेत्री श्रुती चौहानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये सर्वजण एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. ही पार्टी श्रुतीच्या वाढदिवसाची होती.

हेही वाचा – KCB: यंदा ‘या’ प्रश्नांची उत्तरं न आल्याने स्पर्धकांनी सोडला खेळ; यापैकी किती उत्तरं तुम्हाला माहितीये?

फोटोंमध्ये आर्यन ब्लॅक टी-शर्ट, डेनिम आणि पिवळ्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तर इसाबेलने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्याचवेळी करणही कॅज्युअल कपडे घातलेला दिसत आहे. आर्यन खानची मैत्रीण श्रुतीने काही जाहिरातींमध्ये काम केलंय आणि ती एक फॅशन मॉडेल आहे.

हेही वाचा – अभिनयासोबत खेळातही A1; दीपिका वडिलांप्रमाणे बॅडमिंटनमध्ये मास्टर तर रणबीर फुटबॉलमध्ये, बरीच मोठी आहे ही यादी

श्रुतीने तिचा वाढदिवस आर्यन खान आणि इसाबेल यांच्याबरोबर साजरा केला. वाढदिवसाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने लिहिलं, “मी जगातली सर्वात भाग्यवान मुलगी आहे. कारण मला माझ्या आयुष्यात माझ्यावर खूप प्रेम करणारे लोक मिळाले.” याशिवाय तिने शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर्यन खानही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. लवकरच तो लेखक आणि चित्रपट निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर इसाबेलने सूरज पांचोलीसह ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. यानंतर ती ‘सुस्वगतम् खुशमदीद’मध्ये दिसणार आहे.