काल बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वाढदिवस होता. त्याच दिवशी तिची बहिण शमिता आणि राकेश बापट यांचा ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. तर आता या दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं ब्रेकअप केला आहे.

आणखी वाचा : ‘पीट सॅमप्रसने फेमस केलेली अर्धी चड्डी पण वीस वर्षांपूर्वी अशोक सराफने…’, सुनील गावस्करांनी सांगितला मजेशी किस्सा

राकेश आणि शमिताची जोडी दोघांची जोडी ही नेहमीच त्यांच्या रोमॅन्टिक फोटो आणि सतत एकत्र दिसल्यामुळे चर्चेत असायचे. इतकच काय तर राकेश बऱ्याचवेळा शमिताच्या कुटूंबासोबतही दिसला आहे. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, त्या दोघांनी सहमतीने ब्रेकअप केल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा : कंगनाने शेअर केला Qatar Airways च्या CEO चा डब केलेला व्हिडीओ, सत्यता कळताच डिलीट केली पोस्ट

आणखी वाचा : ‘अक्षयने माझा वापर केला आणि मला सोडून दिले ’, शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शमिताच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं आपल्यासाठी वेगळ्या वाटा निवडल्या आहेत. ते दोघे वेगळे झाले असले तरी एकमेकांप्रती त्यांच्या मनात मैत्री आणि सम्मान कायम असेल असं सूत्रांचे म्हणणे आहे. दोघं कायम एकमेकांचे मित्र असतील असं देखील सूत्रांनी म्हटलं आहे. राकेश आणि शमितानं नुकतंच एका म्युझिक अल्बमचं शूटिंग पूर्ण केलं आहे, जो लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. किमान यामुळे चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री स्क्रीनवर पहायला मिळेल.