बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री शमिता शेट्टी शो संपल्यानंतर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. नुकताच शमिताच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसांच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात आता शमितानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बहीण शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी केसवर आपली प्रतिक्रिया दिली. जेव्हा राज कुंद्राला अटक झाली त्यावेळी शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती.

शमिता शेट्टीनं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्रा प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं. यावेळी तिनं बहीण शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगात तिच्यासोबत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. ती म्हणाली, ‘मला खरंच या गोष्टीचं वाईट वाटतं की शिल्पाच्या आयुष्यातील कठीण काळात मी तिच्यासोबत नव्हते. खरं तर मी त्यावेळी तिच्यासोबत असायला हवं होतं. जेव्हा मी बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा मला सातत्यानं तिची काळजी वाटत होती. तिच्यासोबत काय घडत आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती.’

शमिता शेट्टी पुढे म्हणाली, ‘आम्ही दोघीही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. त्यामुळे तिच्यासोबत काय घडतंय हे मला जाणून घ्यायचं होतं. आम्ही दोघीही नेहमीच एकमेकांसोबत खंबीरपणे उभ्या राहिलो आहोत. तो काळ माझ्या बहिणीसाठी सर्वात कठीण काळ होता. तिच्याबद्दल बरंच काही बोललं गेलं. पण तरीही ती खंबीर राहिली. मला तिचा अभिमान वाटतो.’

View this post on Instagram

A post shared by SHAMITA SHETTY (@shamitashetty_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक झालेली असताना शमिता बिग बॉसमध्ये सहभागी होती. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. याबाबत शमिता म्हणाली, ‘माझा या घटनेशी काहीच संबंध नव्हता. त्यामुळे मी विचार केला की, मी बिग बॉसमध्ये सहभागी होऊ शकते. त्यावेळी करोनाचा काळ सुरू होता. त्यामुळे अनेकांकडे काम नव्हतं. मग मला काम मिळत असताना त्याचा अनादर का करू? असा विचार करून मी ती ऑफर स्वीकारली.’