बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. तर २७ जुलैला न्यायालयाने राजला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी आणि तिची बहिन शमिता शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, शमिता पुन्हा एकदा ट्रोल्सचा शिकार झाली आहे. शमिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शमिता एका सलूनमध्ये जाताना दिसतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शमिताचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू शेअर केला आहे. या व्हिडीओत शमिताने पांढऱ्या रंगाच टी-शर्ट आणि निळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. शमिता जुहूत असलेल्या या सलूनमध्ये गेली होती. शमिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी शमिताला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘काही झालं तरी स्टाइलमध्ये रहायचं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कुटुंबापेक्षा जास्त महत्वाचं सलून आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘जीव गेला तरी चालेल पण स्टाइल गेली नाही पाहिजे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘भावजीच्या पैश्यांवर मजा करते आणि आज भावजी तुरुंगात तर मेहूणी सलूनमध्ये.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काय कुटुंब आहे…बहिणीचा नवरा तुरुंगात आहे आणि तू सलूनमध्ये.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘भावजी तुरुंगात आणि मेहूणी मज्जा करते.’

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शमिताला ट्रोल केले आहे.

 

आणखी वाचा : “मी घाणेरडी दिसते का? हे पॉर्न आहे का?”, इन्स्टाग्रामवर न्यूड लाइव्ह करत गहनाने विचारले प्रश्न

या आधी शमिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिण शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिला होता. “कधी कधी आपल्यात असलेली शक्ती ही कायम एखाद्या मोठ्या अग्नीच्या स्वरूपात कोणाला दिसत नाही, ती एखाद्या लहान ठीणगीच्या रूपाम जिवंत असते…तू पुढे जात रहा. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं किंवा ते आपल्याविषयी काय विचार करतात यावर आपण नियंत्रण करू शकत नाही,” अशा आशयाचे ट्वीट शमिताने केले आहे. या पुढे शमिताने आणखी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये शमिता म्हणाली होती की, “सध्या ते ज्याकाही वैयक्तिक समस्यांमधून जात आहेत आणि..त्याच्याशी तुमचा काही संबंघ नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि प्रेमाने तुम्ही तुमचं काम करत रहा.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamita shetty troll for going salon after raj kundra arrest in pornography case dcp
First published on: 03-08-2021 at 12:30 IST