मराठी अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुदद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसतात. त्यांची वक्तव्यं अनेकदा चर्चेत असतात पण यासोबतच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. आताही शरद पोंक्षे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एका महिलेनं केलेलं आक्षेपार्ह ट्वीट शेअर केलं आहे.
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टसह त्यांनी, एका महिलेनं सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना शरद पोंक्षे यांनी, “कोणताही पुरावा नसताना सावरकरांची बदनामी करणाऱ्या या मोनाचा तीव्र शब्दात निषेध. केतकीसारखं हिला तुरूंगात टाकणार का?” असं म्हटलं आहे. शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेक युजर्सनी कमेंट करत संबंधित महिलेच्या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा-‘लाल सिंग चड्ढा’ने हिट चित्रपटांना टाकलं मागे, भारतात सुपरफ्लॉप पण परदेशात कमावले ‘इतके’ कोटी
शरद पोंक्षे यांनी पोस्ट शेअर केलेल्या ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मोना आंबेगावकर नावाच्या युजरच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये मोनाने स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात गंभीर आरोप करणारं ट्वीट केलं आहे.
मोना आंबेगावकर यांचं हे ट्वीट सुजाता आनंदन नावाच्या एका युजरने रिट्वीट करताना, “कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पकडून आणलं होतं, तेव्हा शिवाजी महाराजांनी तिला सुरक्षितपणे आणि आदरपूर्वक परत सुभेदाराकडे पाठवलं होतं. शिवाजींनी त्या महिलेला आदराने परत पाठवणं, हे मूर्खपणाचं होतं असं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तथाकथित मत होतं.” अशा अर्थाचं कॅप्शन देत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आणखी वाचा-“एकीकडे वेदना होत असताना दुसरीकडे मात्र…” शरद पोंक्षे यांनी शेअर केली खास पोस्ट

दरम्यान शरद पोंक्षे यांनी या ट्वीटचा स्क्रिनशॉट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत याचा निषेध व्यक्त केला आहे. सावरकरांच्या विरोधात अशाप्रकारचा कोणताही पुरावा नसताना त्यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह लिहिल्याबद्दल या महिलेला केतकी चितळेसारखंच तुरुंगात टाकणार का असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.