दहिसर क्राईम ब्रँच युनिट १२च्या पोलीस टीमने २००६ साली मुंबईशी काडीमात्र संबंध नसलेल्या हैदराबाद येथे घडलेल्या एका गुन्ह्याचा कसा छडा लावला ते तुम्हाला येत्या १३ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील अनेक प्रकारांमधला एक प्रकार म्हणजे मिसींग केस. त्याचप्रमाणे आजवरच्या पोलिसी अभ्यासावरून पोलिसांनी हा निष्कर्ष काढलाय की बेपत्ता व्यक्ती ही कधी ना कधी जिवंत किंवा मृतावस्थेत सापडतेच. खारघर येथे राहणाऱ्या पन्नास वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत नेमकं असंच काहीसं घडलं … हसरा खेळकर जेरॉम दि. ३१ जानेवारी २००९ या दिवसानंतर अचानक बेपत्ता झाला. मिसिंग जेरॉमचं गूढ पनवेल क्राईम ब्रँचच्या युनीट २ ने कसं उकळून काढलं … त्याचा बुरखा फेडणारी ही धक्कादायक कथा तुम्हाला १४ जानेवारीला रात्री ९ वाजता पाहता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २००६ मध्ये हैदराबाद मधील आलुकास ज्वेलरी शॉप मध्ये मोठी चोरी झाली. संपूर्ण भारतभर त्याची चर्चा सुरु होती. चोरीची स्टाईल मुंबईतील दहिसर पोलिसांना ओळखीची वाटली. विनोद नावाच्या मुंबईतील तडीपार गुंड, ज्याने मुंबईमध्ये अश्या प्रकारच्या चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांना त्याचा संशय आला. पोलीस अधिकारी सुनील दरेकर यांनी त्यांच्या माणसांना कामाला लावले. गुन्हा घडला होता हैदराबाद मध्ये, ज्याचा मुंबई पोलिसांचा काहीही संबंध नव्हता. पण गुन्हा हा गुन्हा असतो आणि पोलिसांची त्यावर व्यवस्थित नजर असतेच. कोणताही पुरावा नसताना एका अंदाजावर सुरु झालेला हा तपास मुंबई पोलिसांना खऱ्या गुन्हेगारापर्यंत घेऊन गेला आणि कश्या प्रकारे त्यांनी हैदराबादमध्ये झालेल्या चोरीतील गुन्हेगाराला सापळा रचून मुंबईच्या एका बारमध्ये पकडले आणि सर्व माल कसा ताब्यात घेतला हे तुम्हाला शुक्रवारच्या भागात पहायला मिळेल.

सन २००९, जेरॉम सलढाणा नावाची व्यक्ती अचानक गायब झाली. जेरॉम हा अतिशय हसरा खेळकर रिटायर्ड धनाढ्य व्यक्ती होता. त्याला मुंबईतील प्रॉपर्टी विकून गोव्याला सेटल व्हायचं होत. आणि अचानक ती व्यक्ती गायब झाली. पनवेल क्राईम ब्रँचच्या युनीट २ चे संतोष धनवडे यांच्याकडे ही केस आली. त्यांनी शोधकार्य हात घेतले. पहिलाच क्लू जेरॉमची स्कोडा गाडी मिळाली पण जेरॉम गायब होता. गाडीच्या स्टिअरिंगवर आणखी एका माणसाचे ठसे सुद्धा मिळाले. पण नक्की काय झालं हे कळत नव्हते. हे शोधकार्य सुरु असतानाच जेरॉमच्या भावाच्या ई मेल आयडीवर शाह नावाच्या व्यक्तीचा ई मेल येतो की त्याने जेरॉमची प्रॉपर्टी १.५० कोटीला विकत घेतली आहे. पोलिसांच्या दृष्टीने हे सगळं विचित्र होतं. ते शाह नावाच्या व्यक्तीच्या तपासाला लागतात. तपास करता करता पोलीस शाहपर्यंत कसे पोहचतात आणि जेरॉमच्या खुनाचा प्लॅन कसा सोडवला जातो याची चित्तरकथा येत्या शनिवारी पाहायला मिळेल.

या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaurya gatha abhimanachi upcoming episode on missing case
First published on: 10-01-2017 at 18:12 IST