सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे संपूर्ण देशवासिंयांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या अकाली निधनामुळे त्याच्या मित्र परिवारासह त्याची खास मैत्रिण शेहनाज गिलला मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस १३’ मध्ये शेहनाज आणि सिद्धार्थमध्ये जवळीक वाढली होती. त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडत होती. सिद्धार्थ या पर्वाचा विजेता ठरला होता. शोमधून बाहेर आल्यावर सिद्धार्थ आणि शेहनाज बराच वेळ एकमेकांसोबत घालवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांना अनेकदा एकत्रित स्पॉटही करण्यात आलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ आणि शेहनाज एका अल्बममध्ये देखील झळकले होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र दोघांनी अधिकृतपणे त्यांच्या नात्याचा खुलासा केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ आणि शेहनाज गिलने ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी करण जोहरसोबत धमाल केली. या शोमध्ये शेहनाजने सिद्धार्थसोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

हे देखील वाचा: सिद्धार्थ शुक्लाला डॉक्टरांनी ‘या’ गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितलं होतं मात्र…

सिद्धार्थसोबत आपलं नातं खूपच खास आणि घट्ट असल्याचं शेहनाज या व्हिडीओ त सांगतेय. यावर करणने सिद्धार्थ आणि शेहनाज गिलने ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये हजेरी लावली होती. शेहनाजला सिद्धार्थ बॉयफ्रेण्ड असल्याचं विचारताच शेहनाजने करणची फिरकी घेतली. बॉयफ्रेण्डची व्याख्या काय असते? असा उलट सवाल तिने करणला विचारला. पुढे ती म्हणाली, “बॉयफ्रेण्ड वैगरे तर सोडून जातात. पण हे चालणार नाही…माझं नातं कधीच तुटणार नाही.” असं शेहनाज या व्हिडीओत म्हणालीय. मात्र दूर्दैवाने आज सिद्धार्थ शेहनाजसोबतच सगळ्यांना मागे सोडून कायमचा निघून गेला आहे.

हे देखील वाचा: नुसरत जहाँ यांनी फोटो शेअर करत केला बाळाच्या वडिलांचा उल्लेख, नेटकरी म्हणाले “हिंमत असेल तर…”

सिद्धार्थ शुक्ला आपलं कुटुंब असल्याचं शेहनाज या व्हिडीओत म्हणाली आहे. या जगाचा निरोप घेण्याआधी सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिलने ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘डान्स दिवाने ३’ याशोमध्ये हजेरी लावली होती. शेहनाज आणि सिद्धार्थच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी ‘सिदनाज’ असं नावही दिलं होतं. शेहनाजला सिद्धार्थशी लग्न करायचे होते अशादेखील चर्चा होत्या. मात्र आता सिद्धार्थच अचानक निधन झाल्याने शेहनाजला धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehnaaz gill talking to bigg boss ott host karan johar about her relationship with sidharth is going viral kpw
First published on: 03-09-2021 at 16:43 IST