scorecardresearch

प्राण यांना ‘जंजीर’चा रिमेक पाहण्याची होती उत्सुकता

ख्यातनाम अभिनेता प्राण यांना त्यांची प्रभावी भूमिका असलेल्या ‘जंजीर’ चित्रपटाचा रिमेक पाहण्याची उत्सुकता होती, असा खुलासा निर्माता अमित मेहरा याने केला.

प्राण यांना ‘जंजीर’चा रिमेक पाहण्याची होती उत्सुकता

ख्यातनाम अभिनेता प्राण यांना त्यांची प्रभावी भूमिका असलेल्या ‘जंजीर’ चित्रपटाचा रिमेक पाहण्याची उत्सुकता होती, असा खुलासा निर्माता अमित मेहरा याने केला. अमितच्या वडिलांनी १९७३ साली दिग्दर्शन आणि निर्मिती केलेल्या ‘जंजीर’ चित्रपटात प्राण यांनी सामर्थ्यशाली ‘शेरखानची’ भूमिका केली होती. या चित्रपटामुळे अमिताभ ‘अॅन्ग्री यंग मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाले. तसेच खलनायक म्हणून ओळखले जाणारे प्राण विविध भूमिका साकारत गेले. अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘जंजीर’ रिमेकमध्ये शेरखानच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे.
अमित म्हणाला की, मी प्राण यांच्याशी ‘जंजीर’च्या रिमेकबाबत बोललो होतो. चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वादही दिला. संजय दत्त शेरखानची भूमिका साकारणार आहे हे कळल्यावर त्यांना आनंद झाला होता. तसेच, रिमेक पाहण्याची त्यांना उत्सुकता होती. मी नेहमी प्राण व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होतो. चित्रपटाविषयीची अद्ययावत माहिती मी त्यांना देत असे, असेही तो म्हणाला. दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्राण यांचे शनिवारी रात्री ८.३० वाजता लीलावती रुग्णालयात निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-07-2013 at 03:09 IST

संबंधित बातम्या