टॉपलेस फोटोवरून ट्रोल झाली होती कियारा आडवाणी, नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर म्हणाली…

टॉपलेस फोटोमुळे कियारा आडवाणी चांगलीच चर्चेत आली होती.

kiara-adwani-topless-photo
(Photo-Instagram@kiaraaliaadvani)

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवणी सध्या तिच्या ‘शेहशहा’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. कारगील युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाची कथा आहे. कियाराने या सिनेमात विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपलची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील कियाराच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलंय.

कियारा सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे देखील चर्चेत होती. सोशल मीडियावर कियारा चांगलीच सक्रिय आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी केलेल्या एका फोटोशूटमुळे देखील मागील वर्षी कियारा चांगलीच चर्चेत आली होती. कियाराने डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. यात तिने शरीर झाकण्यासाठी केवळ एक पान हातात धरलं होतं. या बोल्ड फोटोमुळे कियाराला अनेकांनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर कियाराने जवळपास दीड वर्षांनंतर मौन सोडलं आहे. कियाराने नुकतीच अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कियाराने तिच्या टॉपलेस फोटोवर आलेल्या कमेंटवर प्रतिक्रिया दिलीय.

हे देखील वाचा: सर्जरीनंतर लगेचच अभिषेक बच्चन शूटिंगसाठी तयार, म्हणाला “मर्द को दर्द नही होता”

अरबाज खानने या शोमध्ये कियारासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्याने कियाराच्या त्या टॉपलेस फोटोंवर आलेल्या नेटकऱ्यांच्या काही कमेंट देखील वाचून दाखवल्या. यात एका नेटकऱ्यांने कमेंटमध्ये म्हंटलं होतं, “२०२० सालामध्ये ही एक तेवढी चांगली गोष्ट घडली.” यावर कियाराने या कमेंटकडे मी कौतुक म्हणून पाहत असल्याचं म्हंटलं. तर दुसऱ्या कमेंटमध्ये नेटकरी म्हणाला होता. “हे पान बकरीने खाउन टाकायला हवं होतं” नेटकऱ्याची ही विचित्र कमेंट ऐकताच कियाराने मात्र भुवया उंचावत नाक मुरडलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

हे देखील वाचा: बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानला तालिबान्यांनी दिली होती जीवे मारण्याची धमकी; शेअर केला ‘तो’ भयानक अनुभव

या फोटोशूटबद्दल सांगताना कियारा म्हणाली, ” मला स्वत:ला माहित नाही हे कुठून कुठे गेलं. डब्बू कॅलेंडर फोटो शूट करतो. पान घेऊन फोटोशूट करण्याची कल्पना त्याची होती. हा शॉट खूप वेगळा होता त्याने तो खूप सूंदर पद्धतीने टिपला आहे. यासाठी इतरांचाही सल्ला घेण्यात आला होता.” असं कियारा म्हणाली.

गेल्यावर्षी कियारा आडवाणीने डब्बू रतनानीसाठी हे टॉपलेस फोटोशूट केलं होतं. कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरही हा टॉपलेस फोटो शेअर केला होता. या फोटोवर काहींनी कौतुक केलं तर अनेकांनी कियाराला ट्रोलही केलं. यावेळी कियाराचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shershaah actress kiara adwani reacts topless leaf photoshoot after trolling kpw

ताज्या बातम्या