अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. फरहान अख्तर हा लवकरच मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. काल ९ जानेवारी रोजी फरहान अख्तरचा वाढदिवस साजराा केला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फरहानची मैत्रीण शिबानी दांडेकरनेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत तिने काही Unseen फोटोही शेअर केले आहेत.
शिबानी दांडेकरही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. शिबानीने फरहानच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. शिबानीने फरहानसोबतचे पाच फोटो पोस्ट केले आहे. यात त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी शिबानीने छान गाऊन परिधान केला आहे. तर फरहानने छान सूट परिधान केल्याचे दिसत आहे.
शिबानीने हे फोटो पोस्ट करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. My Foo, येणारे वर्ष तुझ्यासाठी आणखी खास असणार आहे. लव्ह यू फॉरएव्हर, वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशी पोस्ट शिबानीने फरहानसाठी लिहिली आहे. विशेष म्हणजे तिने याद्वारे तिने प्रेम आणि शुभेच्छा दोन्हीही व्यक्त केले आहे.
शिबानीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यावर इलियाना डिक्रूझ, आस्था शर्मा, अदिती सिंग शर्मा यांनी फरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विकी-कतरिनानंतर आता फरहान अख्तर ‘या’ मराठमोळ्या मॉडेलशी बांधणार लग्नगाठ
दरम्यान फरहान आणि शिबानी मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी मुंबईत मार्च महिन्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण करोनाचा वाढता प्रभाव आणि बॉलिवूड कलाकरांना होणारा करोनाचा संसर्ग पाहाता त्यांनी लग्न खासगी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीय हजेरी लावणार आहेत.