shilpa shetty on work in malayalam industry : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘KD: द डेविल’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालाय.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ‘केडी – द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटात दिसणार आहे. तिने मल्याळम चित्रपटाची चाहती असूनही, कधीही त्यात का काम केले नाही हे सांगितले आहे ‘केडी…’ चित्रपटाच्या टीझर लाँचच्या वेळी तिने तिच्या संकोचाबद्दलचा खुलासा केला. शिल्पा शेट्टीने तमीळ, तेलुगू, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तिने खुलासा केला की, तिला मल्याळम चित्रपट उद्योगातील निर्मात्यांकडून अनेक ऑफर आल्या होत्या. शिल्पाने पिंकव्हिलाला सांगितले, “मी त्यांना कधीही हो म्हटले नाही. कारण मला भीती वाटते.”

मल्याळम चित्रपटांवर आहे प्रेम

शिल्पा म्हणाली की, तिचे मल्याळम चित्रपटांवर खूप प्रेम आहे. ती म्हणाली, “मला मल्याळम चित्रपट खूप आवडतात आणि ही इंडस्ट्री भावना कशा प्रकारे सादर करते ते पाहून मी आश्चर्यचकितही होते.” मल्याळम चित्रपटांमधील कथा आणि अभिनय वेगळ्या पातळीवर असल्याचेही तिने सांगितले.

ती पुढे म्हणाली, “मला कधीच वाटलं नव्हतं की, जर मी या इंडस्ट्रीत काम केलं, तर मी माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेन. पण बघूया, कदाचित मी एक दिवस मल्याळम चित्रपट करीन.”

मोहनलालबरोबर करायचंय काम

शिल्पाला जेव्हा विचारण्यात आले की, मल्याळम इंडस्ट्रीमध्ये असा कोणी अभिनेता आहे का, ज्याच्याबरोबर तिला काम करायला आवडेल, तेव्हा तिने मोहनलालचे नाव घेतले. ती म्हणाली, “तो अद्भुत आहे. इतक्या वर्षांनंतरही तो तसाच दिसतो. तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत अद्भुत अभिनेत्यांपैकी एक आहे.” तिने असेही सांगितले की, तिचा आवडता चित्रपट ‘नोक्केथाधुरथु कन्नम नट्टू’ (१९८४) आहे.

‘KD : द डेविल’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी बऱ्याच वर्षांनंतर अभिनेता संजय दत्तबरोबर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शानाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटातील कलाकार

‘केडी – द डेव्हिल’ बद्दल बोलायचे झाले तर, प्रेम यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ध्रुव सरजाच्या या चित्रपटात संजय दत्त, रेश्मा नानैया, व्ही. रविचंद्रन व रमेश अरविंद यांच्याही भूमिका आहेत.