बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राच्या अटकपासूनच रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तर दुसरीकडे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.
राज कुंद्राला अटक झाल्यापासूनच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. यातच आता शिल्पा शेट्टीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत शिल्पा आपला पती राज कुंद्राच्या खडतर दिवसांबद्दल बोलताना दिसतेय. शिल्पाचा हा व्हिडीओ फिटलुक मॅग्झिन नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलाय. या जुन्या व्हिडीओत राज कुंद्राच्या आई-वडिलांबद्दल ती बोलतेय.
View this post on Instagram
राज कुंद्राचे वडिल लंडनमध्ये बस कंडक्टर होते तर आईदेखाल एका फॅक्टरीत काम करायची असं शिल्पा या व्हिडीओत म्हणाली आहे. त्यावेळी राज कुंद्राच्या आई वडिलांना देखील मोठा संघर्ष करावा लागला होता. ६ महिन्यांचं बाळ साभाळत ते नोकरी करायचे असं शिल्पा यात म्हणालीय. राज कुंद्राला मोठा संघर्ष करावा लागल्याचं शिल्पा म्हणालीय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर अनेक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत शिल्पाला ट्रोल करत आहेत. “हो पॉर्न बिझनेसमध्येही खूप संघर्ष आहे.” असं म्हणत काही नेटकऱ्यांनी शिल्पाची खिल्ली उडवली आहे. तर एक नेटकरी म्हणाला “संघर्ष पुन्हा सुरु”
शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा-२’ हा सिनेमा २३ जुलैला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून शिल्पा शेट्टीने १४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलंय.