‘रॉक ऑन-२’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शिलाँगला गेलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या डोळ्याला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याने उपचारासाठी ती पुन्हा मुंबईला रवाना झाली आहे. शिलाँगमध्ये ‘रॉक ऑन-२’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रद्धाच्या डोळ्यात अचानक काहीतरी गेल्याने तिला त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला स्थानिक डॉक्टरकडे देखील नेण्यात आले. पण त्रास कमी न झाल्याने चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानीने श्रद्धाला मुंबईला परतण्याचा सल्ला दिला. मुंबईत डोळ्याच्या डॉक्टकरांकडून तपासणी झाल्यानंतर श्रद्धाच्या डोळ्याच्या बुबुळाला ओरखडा पडल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉक्टरांनी श्रद्धाला काही दिवसांचा आराम करण्याचा सल्ला दिला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘रॉक ऑन-२’ च्या सेटवर श्रद्धा कपूरला दुखापत
'रॉक ऑन-२' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शिलाँगला गेलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या डोळ्याला चित्रीकरणादरम्यान दुखापत
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 20-10-2015 at 19:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha kapoor injured on the sets of rock on