छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इतकच काय तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. श्वेताने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण यावेळी फक्त श्वेताचा फोटो नाही तर तिने दिलेल्या कॅप्शनची चर्चा सुरु आहे.

श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्वेताने मल्टीकलरचा ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये श्वेता हसताना दिसते. हा फोटो शेअर करत “वे: इतना क्या हंस रही है?”, “‘हम: तेरे बाप का क्या जाता है?” असे कॅप्शन दिले आहे. श्वेताचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

आणखी वाचा : ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video

श्वेताने दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या कॅप्शनवर मजेशीर कमेंट केली आहे. अभिनेता फहमान कमेंट करत म्हणाला, त्याचा बाप मजनू आहे आणि मजनू नेहमी जळतो अगं. तर अनेक नेटकऱ्यांनी श्वेताच्या स्माइलची स्तुती केली आहे.

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, श्वेता आणि तिची मुलगी पलक तिवारी या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. बोल्डनेसमध्ये श्वेता पलकला टक्कर देते असं म्हणायला हरकत नाही.