scorecardresearch

ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video

ऐश्वर्या रायचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

aishwarya rai bachchan, abhishek bachchan, deepika padukone, ranveer singh,
ऐश्वर्या रायचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या अभिनयासोबतच तिच्या उत्तम डान्ससाठी ओळखली जाते. ऐश्वर्याने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या डान्स प्रकारचे डान्स केल्याचे आपण पाहतो. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच ऐश्वर्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हा व्हिडिओ ईशा अंबानीच्या लग्नाआधीच्या पार्टीचा आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यादरम्यान ऐश्वर्या-अभिषेक, रणबीर-दीपिकाचे अनेक इनसाइड व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या तिच्या व्हिडीओत पहिले अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते दिल धडकने दो या चित्रपटातील गल्ला गुडिया या गाण्यावर डान्स करत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या मग्न होऊ डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या दीपिकासोबत डान्स करताना दिसत आहे.

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

आणखी वाचा : “शूट करणं बंद करा…”, फोटोग्राफर्सवर संतापला तैमूर; पाहा व्हिडी

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

दरम्यान, २० एप्रिल रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाचा वाढदिवस होता. २००७ मध्ये त्यांनी मुंबई अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर सत्पतदी घेतल्या होत्या. त्यांना एक मुलगी असून आराध्या असे तिचे नाव आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-04-2022 at 20:18 IST

संबंधित बातम्या