‘समीर’…एकुलता एक मुलगा, तो ही मनाने आणि राहणीमानाने एकदम साधा पण त्याचं लव्ह मॅरीज होणार असे गडबडे बाबांनी केलेले भाकीत. एक से बढकर एक, नटखट, प्रेमळ, ग्लॅमरस तरुणी आणि जिगरी दोस्त ‘बाब्या’चे लव्ह टीप्स… या सर्व गोष्टींमुळे एंटरटेन्मेंट पॅकेज असलेल्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटात खूप सारे मनोरंजक किस्से आणि धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडिओ निर्मित आणि प्रदीप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने बाब्याची आणि सौरभ गोखलेने समीरची भूमिका साकारली आहे. समीरच्या आयुष्यात येणा-या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल या अभिनेत्रींनी साकारली आहे.

सिद्धार्थ आणि सौरभसोबतच महेश मांजरेकर यांनी साकारलेली गडबडे बाबा ही भूमिका विशेष लक्ष वेधून घेते. तसेच कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखील ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ची रंगत वाढवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुष्यात प्रेम नाही केलं तर ते आयुष्य व्यर्थ आहे असं सांगणारा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपट १ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.