Sidharth Malhotra Gave Shanaya Kapoor a Midnight Birthday Surprise : अलिकडेच, ‘परम सुंदरी’ चित्रपटातील कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, संजय कपूर, मनजोत सिंग आणि इनायत वर्मा कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल’ शोमध्ये दिसले. शोदरम्यान अभिनेता संजय कपूरने खुलासा केला की सिद्धार्थ माझ्या मुलीचा क्रश होता.

संजय कपूर म्हणाला, “त्यावेळी शनायाचा १३ वा वाढदिवस होता. त्यावेळी सिद्धार्थ ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपट करत होता आणि शनायाला तो आवडला होता. करणने रात्री १२ वाजता तिला वाढदिवसाची भेट पाठवली होती.”

सिद्धार्थ म्हणाला, “मला करणचा मेसेज आला की आज कोणाचा तरी वाढदिवस आहे. मला वाटलं की आज त्याचा (संजयचा) वाढदिवस आहे, पण तो शनायाचा वाढदिवस होता. म्हणून मी तिच्या घरी गेलेलो.” संजय पुढे म्हणाला, “करणने सिद्धार्थ आणि वरुण दोघांनाही आमंत्रित केले होते, पण वरुण म्हणाला, ‘मी का जाऊ? ती सिद्धार्थची चाहती आहे.”

दरम्यान, शोमध्ये इनायत वर्माने सांगितले की तिने रणबीर कपूर, अभिषेक बच्चन आणि आता जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्याबरोबर काम केले आहे. जेव्हा कपिल शर्माने विचारले की तिचे शिक्षक तिला विचारतात का आम्ही सेटवर येऊ का? तेव्हा इनायत म्हणाली, “हो, ते विचारतात. ‘मला त्यांच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे. प्लिज इनायत असे म्हणतात. माझे वर्गमित्र बहुतेकदा जान्हवी मॅडम आणि सिद्धार्थ सर प्रत्यक्षात कसे आहेत असे विचारतात.”

‘परम सुंदरी’ हा चित्रपट तुषार जलोटा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर ‘परम सुंदरी’ला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याची जबरदस्त कमाई सुरू आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7.25 कोटी रुपये कमावले आणि दुसऱ्या दिवशी नऊ कोटी कमावले आहेत. यासह हा सिद्धार्थच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा पाचवा चित्रपट ठरला आहे. पहिल्या दोन दिवसांची कमाई जवळपास 16.75 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.