सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल करणार होते लग्न?

सिद्धार्थने ट्वीट करत यावर दिले होते स्पष्टीकरण.

siddharth-shenazz
Photo-Loksatta File Images

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा छोट्या पडद्यावरचा आणि चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय चेहरा होता. याचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. सिद्धार्थ शुक्ला याने वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. काही महिन्यांपासून अशी चर्चा होती की तो त्याची जवळची मैत्रीण शहनाज गिल सोबत लग्न करणार होता.

सिद्धर्थ शुक्ला आणि शहनाज गिल हे खुप जवळचे मित्र असून त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती की त्यांचे लग्न व्हावे. त्यांना सगळे एक कपल म्हणून समजत होते, एव्हढच नव्हे तर ते लग्न करणार आहेत अशा बातम्या ही समोर येत होत्या. या सगळ्याचे स्पष्टीकरण देत सिद्धार्थने त्याच्या चाहत्याला उत्तर दिले होते. सिद्धार्थ शुक्ला सोशल मीडियावर सक्रिय होता. फॅन्सने विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तरे देत असे असंच एका फॅनच्या ट्विटला उत्तर देत सिद्धार्थने सांगितलं होतं “भाई मी कुवाराॅ आहे तोच चांगला आहे… मी लग्न केले नसले तरी काही वृत्तपत्रांनी मी लग्न केले आहे ही बातमी देत आहेत..बहुतेक त्यांना माझ्या बद्दल माझ्या पेक्षा जास्त माहिती असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थ शुक्लाच लग्न झालं नसून त्याचा आणि शहनाज गिलमधील असलेला बॉण्ड हा ‘बिग बॉस १३’ च्या घरात असल्या पासूनचा होता. त्यांची ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडत होती आणि म्हणूनच त्यांच्या चाहत्यांनी #sidnazz असा टॅग त्यांना दिला होता. ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त या दोघांनी दोन म्युझीक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघं ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘डान्स दिवाने’या दोन शो मध्ये स्पेशल जज म्हणून गेले होते.

सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sidhharth shukla and shenazz gill were all set to get married aad