सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षांची आई चरण कौर यांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा एकदा सिद्धूचे आई-वडील पालक झाले आहेत.

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्धू एकुलता एक असल्याने त्याच्या पालकांनी हा निर्णय घेतला. दिवंगत भाऊ सिद्धू मुसेवालाच्या स्मरणार्थ या नवजात मुलाचं नाव शुभदीप सिंह सिद्धू असं ठेवलं आहे. टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क येथे बलकौर सिंह शुभदीप आणि सिद्धू यांचे व्हिडीओज दाखवण्यात आले आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरला सिद्धू, बलकौर सिंह आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे फोटो एका व्हिडीओद्वारे झळकले. याचा व्हिडीओ एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “सिद्धूसाठी मोठा क्षण आहे. त्याचे वडील आणि नवजात बाळाचा फोटो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकत आहे”, असं कॅप्शन त्या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओत सिद्धू मुसेवालाच्या लहानपणीचे फोटो दाखवले आहेत. त्याचबरोबर त्याच्या वडिलांचे आणि बाळ शुभदीपचे फोटोसुद्धा दाखवले आहेत.

हेही वाचा… खूपच गोंडस दिसतो गौहर खानचा १० महिन्यांचा लेक, अभिनेत्रीने रमजानच्या पवित्र महिन्यात दाखवला जेहानचा चेहरा

टाइम्स स्क्वेअरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “टाइम्स स्क्वेअरसाठी मोठा क्षण”, “स्टार म्हणून जन्माला आलेला शुभदीप आमच्या पंजाबचा अभिमान आहे”, अशाप्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… तिरुपतीच्या दर्शनासाठी जान्हवी कपूर गुडघे टेकत चढली पायऱ्या; म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क…”

दरम्यान, सिद्धू मुसेवाला याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही, तर जगभरात आहे. आजदेखील सिद्धू मुसेवाला याची गाणी ऐकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, ज्यामुळे आजही गायकाची मोठी कमाई होते. यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही सिद्धू मुसेवाला याची कमाई होते.