अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबार सध्या सौदी अरेबियातील मक्का येथे आहेत. रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने ही जोडी आपल्या मुलाचं म्हणजेच जेहानचं पहिलं रमजान मका येथे साजरा करत आहेत. जेहानच्या जन्मानंतर पहिल्यांदाच त्यांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गौहर खान आणि जैद दरबार यांनी मे २०२३ रोजी आपल्या पहिल्या अपत्याचं स्वागत केलं. दोघांनी पहिल्यांदाच आपल्या जेहानचा चेहरा जगासमोर आणला. गौहर आणि जैदने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामला पोस्ट शेअर केली, ज्यात जेहानबरोबरचा त्यांचा फॅमिली फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्यांनी लिहिले, “अल्लाहच्या दरबारातून आमच्या छोट्या राजपुत्राचा सलाम कबूल करा, अल्लाह आमच्या पुत्रावर प्रसन्न होवो. अमीन. आमचा जेहान”

Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi Actor Shubhankar Ekbote Meets Aamir Khan
“जन्म १९९४, पहिला चित्रपट पाहिला…”, मराठी अभिनेत्याचं नाटक पाहायला आला आमिर खान! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
siddharth khirid reveals girlfriend face
गोव्यात ड्रीम प्रपोज अन्…; प्रेमाची कबुली देत मराठी अभिनेत्याने दाखवला गर्लफ्रेंडचा चेहरा! होणारी पत्नी आहे सौंदर्यवती, तिचं नाव काय?
singer armaan malik got married to aashna shroff
प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर
sairat fame marathi actor tanaji galgund girlfriend
‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….

त्यांनी पुढे लिहिलं, “जेहानसाठी तुमची सकारात्मकता, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्यावा ही विनंती. तुम्हालाही आमच्याकडून खूप सारं प्रेम.” अनेक जणांनी यावर प्रतिक्रिया देत कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, “जेहान अगदी गौहरसारखा दिसतोय”, तर “खूप गोड”, “खूप प्रेम” अशा कमेंट्स अनेक जणांनी केल्या आहेत.

हेही वाचा… तिरुपतीच्या दर्शनासाठी जान्हवी कपूर गुडघे टेकत चढली पायऱ्या; म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क…”

गौहर आणि जैदच्या मुलाच्या जन्मानंतर एका महिन्याने त्यांनी मुलाचे नाव जेहान घोषित केले. एक पोस्ट शेअर करत दोघांनी त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. “आमचा जेहान, आमच्या मुलाचे नाव. त्याच्या जन्मापासून एका महिन्यानंतर त्याचे नाव आम्ही आज जाहीर केले. तुमच्या प्रेमाबद्दल, आशीर्वादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले.

दरम्यान, अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबार २५ डिसेंबर २०२० रोजी लग्नबंधनात अडकले. माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान किराणा सामानाची खरेदी करताना दोघे भेटले होते. त्यानंतर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने चांगली बातमी देत त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केले.

Story img Loader