सिनेमाच्या जगात एखादे साम्य दिसले की त्यासोबत शंका यायलाच हवी. बघा कसे ते, विक्रम भटचा ‘हॉरर स्टोरी’ आणि अनुभव सिन्हाचा ‘वॉर्निंग’ या दोन भयपटाचा फर्स्ट लूक एकाच दिवशी तर झालेला, पण एका मागोमागच्या सोहळ्यात प्रकाशित झाले. दोन्हीत भीती भोवतीची कथा हे साम्या असले तरी ‘हॉरर स्टोरी’ भूतपट आहे, तर ‘वॉर्निंग’ हा समुद्राच्या तळाशी घडलेला संघर्ष आहे. पण खरे साम्य वेगळेच आहे. दोन्हीत तीन युवती आणि चार युवक असे मिळून एकूण सातजण सहलीला जातात आणि त्याना थरारक अनुभव येतो. हॉरर शोचे सातजण पंचतारांकित हॉटेलमधील भूताचा थरारक अनुभव घेतात, तर वॉर्निंगच्या सातजणांची बोट भर समुंद्रात उलटते.
दोन्हीत नेमके सात मित्र का? एखाद्या विदेशी चित्रपटात असे सातजण एखाद्या संककटात सापडले असतील. त्याच चित्रपटावरून प्रेरणा घेताना सातजण हे साम्य कायम राहिले असावे. सिनेमाच्या जगात उगाचच योगोयोग घडत नाहीत.