scorecardresearch

Bappi Lahiri : प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bappi Lahiri : प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”

बप्पी लहरी यांना प्रकृतीविषयक अनेक त्रास सुरू होते. त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झाला, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.

मागील वर्षी बप्पी लहरी यांना करोना संसर्ग

दरम्यान, बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले.

बप्पी लहरी यांच्या निधनावर अनेक मान्यवरांकडून दुःख व्यक्त

सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी)

अतुल भातखळकर (आमदार, भाजपा)

ए. आर. रहमान (गायक, संगीतकार)

राजनाथ सिंह (केंद्रीय संरक्षण मंत्री)

बप्पी लहरी कोण होते?

बप्पीदा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2022 at 08:18 IST