बॉलिवूडमधील पार्श्वगायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. इंडस्ट्रीमध्ये जवळपास १५ वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोज जज केले आहेत. नेहाने वयाच्या १६ व्या वर्षी पहिल्यांदा इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. पण काही कारणास्तव ती शो जिंकू शकली नव्हती. आता शोमध्ये स्पर्धकांना जज करताना नेहा अनेकदा भावुक होते. त्यामुळे तिला ‘क्राय बेबी’ असंही म्हटलं जातं आणि याच कारणामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “जगभरातील प्रेक्षकांना…”; बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याची कारणं सांगत फरहान अख्तरने व्यक्त केलं मत

अलीकडेच, ETimes ला दिलेल्या मुलाखतीत नेहा कक्करला ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आलं, त्यावर तिन उत्तर दिलं. ती म्हणाली, “मी अशा लोकांना दोष देऊ शकत नाही. कारण असे बरेच लोक आहेत जे अजिबात भावनिक नसतात. त्यामुळे त्यांना मी खोटी वाटेन. पण जे लोक माझ्यासारखे भावनिक आहेत, ते मला समजून घेतील आणि माझ्याशी रिलेट करतील. आज आपल्याला इतरांच्या वेदना समजून घेणारे आणि त्यांना मदत करू इच्छिणारे फारसे लोक दिसत नाहीत. माझ्यात इतरांचं दुःख समजून घेण्याचे गुण आहेत आणि मला त्याची अजिबात खंत नाही.”

हेही वाचा – शैलेश लोढांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार तारक मेहतांची भूमिका?

नेहा पुढे म्हणाली की, “जेव्हा आम्ही दाखवतो की एक स्पर्धक खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करून इथपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे लोक स्वतःला त्याच्याशी जोडू शकतात, कारण प्रत्येकाने कधी ना कधी काही तरी मिळवण्यासाठी संघर्ष केला असतो. आम्ही शोमध्ये फक्त तेच दाखवतो, जे आमच्या घरांमध्ये होतं.”

हेही वाचा – VIDEO: ‘लग्नाला उशीर का करतीयेस?’ अमिताभ यांनी विचारलेल्या या प्रश्नावर स्पर्धक ऐश्वर्याने दिलं मजेशीर उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शो मजेदार बनवण्यासाठी त्यात काही गोष्टी अॅड केल्या जातात. शोमध्ये फक्त डान्स आणि गाणी दाखवणं कंटाळवाणं असू शकतं, त्यामुळे स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरही लक्ष केंद्रित केले जाते. प्रेक्षकही स्वतःला त्यांच्याशी रिलेट करू शकतात,” असं नेहाने सांगितलं. दरम्यान, नेहा नुकतीच सुपरस्टार सिंगर २ मध्ये दिसली होती. आता ती इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोच्या १३व्या सीझनमध्ये जज म्हणून दिसणार आहे.