गेल्या काही दिवासांपासून गायिका सुनिधी चौहान आणि तिचा पती हितेश सोनिक यांच्याबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. दोघेही वेगळे राहत असल्याचंही कळत आहे. याबद्दल हितेशने मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण आता सुनिधीनेही या विषयावर आपलं मौन तोडलं आहे.
चर्चा आहे की सुनिधी आणि तिचा पती हितेश गोव्याला फिरायला गेले होते. तिकडून परत आल्यापासूनच त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. दोघे एकत्र राहत नाहीत अशीही चर्चा होती. मात्र सुनिधीने यावर काहीही बोलण्यास मनाई केली होती. आता या दोघांचं लग्न मोडणार असंही ऐकायला मिळत होतं. मात्र, तेव्हाही सुनिधी काहीच बोलली नाही.
View this post on Instagram
पण आता टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सुनिधीने या विषयावर भाष्य केलं आहे. ती म्हणाली की आता ती आणि हितेश एकत्र राहत असून त्यांच्यात आता सगळं ठीक आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांमध्ये काही कारणाने वाद सुरु होते. मात्र आता सगळं ठीक असून दोघे एकत्र राहत आहेत.
सुनिधीचं हे दुसरं लग्न असल्याची माहितीही मिळत आहे. १८ वर्षांची असताना सुनिधीने बॉबी खानसोबत लग्न केलं होतं. पण एका वर्षानंतरच ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर २०१२ साली सुनिधीने हितेशशी लग्न केलं. जानेवारी २०१८ला तिने मुलाला जन्म दिला.
सुनिधीने आपल्या करियरची सुरुवात १९९६च्या ‘शास्त्र’ या चित्रपटातून केली होती. तेव्हा ती १२ वर्षांची होती. आज ती बॉलिवूडमधल्या सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे.