अनेक दिवसांपासून ‘सितारे जमीन पर’च्या ट्रेलरची उत्सुकता होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आमिर खान पुन्हा एकदा एक नवीन, हृदयस्पर्शी व प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाला आहे.

अल्पावधीत ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर व्हायरल झाला आहे. ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर पाहिल्यानंतर आमिरच्या या आगामी चित्रपटाबद्दलचा तुमचा उत्साह नक्कीच वाढेल. ‘सितारे जमीन पर’ सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं आणि आता निर्मात्यांनी ट्रेलर प्रदर्शित केला.

‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज

काही वर्षांपासून, ‘सितारे जमीन पर’ हे नाव सतत चर्चेत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबाबतची नवीनतम अपडेट समोर आली होती. या चित्रपटात आमिर बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे.

‘सितारे जमीन पर’च्या ट्रेलरमध्ये असं दिसतं की, आमिर खान एक बास्केटबॉल कोच असतो. त्याला ड्रिंक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून कोर्टात शिक्षा होते. त्याला दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवायला सांगितलं जातं. पुढे आमिरची या मुलांशी ओळख होते. दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवून, त्यांची बास्केटबॉल टीम बनविण्याचं महत्त्वाचं चॅलेंज आमिर घेतो. त्यामध्ये तो यशस्वी होतो का? त्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? त्याची कहाणी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते.

तीन मिनिटे १९ सेकंदा’, तुम्हाला आमिर खान आणि जिनिलीया डिसूझाची झलक पाहता येईल. त्याशिवाय चित्रपटातील इतर स्टारकास्टची झलकही दिसून येते. एकंदरीत ‘सितारे जमीन पर’चा हा ट्रेलर तुमचं मन सहज जिंकून घेईल आणि आमिर खानच्या या आगामी चित्रपटाबद्दल तुमचा उत्साह वाढवेल.

ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी आमिर खाननं जिनिलीयाचा पती व बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखला ‘सितारे जमीन पर’ची पहिली झलक दाखवली. सोशल मीडियावर रितेशनं चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केले. रिलीज झाल्यानंतरही ‘सितारे जमीन पर’ चाहत्यांना त्याच प्रकारे प्रभावित करीत राहील, अशी अपेक्षा केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सितारे जमीन पर’ कधी प्रदर्शित होईल?

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा शेवटचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अशा परिस्थितीत आमिरची अभिनय कारकीर्द ‘सितारे जमीन पर’च्या यशाशी जोडलेली आहे. आमिर खानचा हा आगामी चित्रपट २० जून २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.