आपल्या सशक्त अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. सशक्त व उत्तम अभिनयाच्या जोरावर स्मिता पाटील यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. स्मिता यांनी ८० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी फक्त हिंदी नाही तर बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले.
स्मिता पाटील या फक्त अभिनेत्री नाही तर स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्य होत्या. स्मिता पाटील यांनी समाजातील महिलांची भूमिका, त्यांच्या लैंगिकतेवर आणि शहरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या चित्रपट करण्यास पसंती दिली.




आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका
आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री
दरम्यान, त्यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी स्मिता यांना १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चक्र’ चित्रपटातील सेमी-न्युड पोस्टर विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर स्मिता म्हणाल्या होत्या, “झोपडीत राहणाऱ्या एखाद्या स्त्रीने असे अंघोळ करणे ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही तिला पाहण्यासाठी रस्त्यात थांबणार नाही. हा पण विचार करणार नाही की ज्यांना रहायला जागा नाही त्यांना अंघोळ करायला कशी जागा असेल. पण जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता आणि हा चित्रपट जेव्हा कमर्शिअल सर्किटमध्ये विकण्यात येतो. तेव्हा पब्लिसिटी ही गोष्ट डिस्ट्रिब्युटर्सच्या हातात असतं.”
आणखी वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्या पेक्षा चर्चा रंगली बाथरूमची, जाणून घ्या कारण
पुढे स्मिता म्हणाल्या, “हिंदुस्तानाच्या लोकांसमोर ही गोष्ट नसेलही पण त्यांना फोर्स करण्यात आलं आहे की या चित्रपटात सेक्स आहे. यामध्ये महिला अर्धनग्न आहेत म्हणून तुम्ही हा चित्रपट पाहायला या. हा एक चुकीचा दृष्टीकोन आहे जो लोकांवर थोपवण्यात येत आहे. जर चित्रपट चांगला असेल तर तो पाहण्यासाठी प्रेक्षक येतील. फक्त अशा पोस्टरमुळे चित्रपट पाहण्यासाठी लोक येणार नाहीत. हे एका प्रकारे पोस्टरचे करण्यात येणार शोषण आहे. हे सगळीकडे म्हणजेच जाहिरांतींमध्ये आणि चित्रपटांमध्ये करण्यात येते. हिरोला नग्न दाखवू शकत नाही, त्याने काही होणार नाही. परंतू जर एखाद्या स्त्रीला नग्न दाखवले तर आणखी १०० लोक येतील असे त्यांना वाटते.” त्यांचा हा मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.