केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी दिग्दर्शक करण जोहरची भेट घेतली. करणसोबत काढलेला एक सेल्फीसुद्धा त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटोला दहा हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. दिल्लीत आयोजित केलेल्या ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’मध्ये या दोघांची भेट झाली. या फोरमला अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते.

दिल्लीत ४ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात करण जोहरने व्यवसाय, चित्रपट निर्मिती आणि त्यांचं बदलतं स्वरुप यावर चर्चा केली. शुक्रवारी स्मृती इराणी आणि करण जोहरमध्ये प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन विश्वातील बदलत्या स्वरूपावर संयुक्त चर्चा झाली. अभिनय क्षेत्रात असताना आपण ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये उपस्थिती लावल्याचा उल्लेख यावेळी स्मृती यांनी केला. कार्यक्रमानंतर करणसोबत काढलेला सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत स्मृती यांनी त्याला ‘द करण जोहर सेल्फी,’ असं कॅप्शन दिलं.

वाचा : अन् तिने शाहरूखला म्हटलं सलमान 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या स्मृती यांनी पाच महिन्यांपूर्वीच इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं. इन्स्टाग्रामवर सध्या त्यांना ७२ हजारहूनही अधिक लोक फॉलो करत आहेत.