‘माझ्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या मला माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही…’, सोमी अलीने केला खुलासा

सोमीने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

somy ali, salman khan
गेल्या ५ वर्षांपासून सोमी सलमानच्या संपर्कात नसल्याचं तिने सांगितलं आहे.

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. मात्र, बऱ्याच अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतरही सलमानने अजून लग्न केले नाही. सलमान आणि अभिनेत्री सोमी अली रिलेशनशिपमध्ये असल्याच्या देखील चर्चा होत्या. सोमी सलमानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. एका मुलाखतीत सोमीने चित्रपटसृष्टीतील तिच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.

सोमीने ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली होती. यावेळी सोमी तिच्या आणि सलमानच्या नात्याविषयी बोलली आहे. सोमीने आधी सलमानवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता आणि आता ती त्याच्या आधीच्या रिलेशनशिपविषयी बोलली आहे. “सलमानने त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरु केले होते. चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचा शोध सुरु होता. त्यासाठी माझी निवड करण्यात आली होती. या चित्रपटाचे नाव ‘बुलंद’ होते. आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काठमांडूला गेलो होतो, पण त्यानंतर त्याचे चित्रीकरण थांबले,” असे सोमीने सांगितले.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

सलमान खानच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर सोमी म्हणाली, “गेल्या पाच वर्षात माझं सलमानशी काहीही बोलणं झालं नाही. मला असं वाटतं की आयुष्यात आपण पुढे जाणं गरजेच आहे. १९९९ मध्ये आम्ही विभक्त झाल्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या हे मला माहित नाही. परंतु मी त्याला माझ्या शुभेच्छा देते. कारण मला माहित आहे की त्याची स्वयंसेवी संस्था खूप चांगल काम करत आहे. त्याच्या ‘बीइंग ह्यूमन’ या स्वयंसेवी संस्थेचा मला गर्व आहे.

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

आणखी वाचा : ‘१४ वर्षांची असताना माझ्यावर बलात्कार झाला होता’, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

पुढे सोमी चित्रपटसृष्टीतील तिच्या कमबॅक विषयी म्हणाली, तिला जर चांगली भूमिका मिळाली तर ती परत येण्याचा नक्कीच विचार करेल. आता सोमीने स्वत: ला चित्रपटसृष्टीपासून दूर केले आहे आणि ती समाजसेवा करते. सोमी आता घरात ज्या महिलांवर हिंसाचार होतो त्यांना मदत करते. ‘नो मोर टियर्स’ असे तिच्या स्वयंसेवी संस्थेचे नाव आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Somy ali says she dont know how many girlfriends salman khan has after they broke up dcp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या