Roshni walias mother asked her to use protection : २३ वर्षीय अभिनेत्री सध्या अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी उघड केल्या आहेत.
आम्ही बोलत आहोत रोशनी वालियाबद्दल. ‘सन ऑफ सरदार २’मध्ये सबाची भूमिका साकारणारी रोशनी वालिया तिच्या बालपणात अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. तिने ‘बालिका वधू’ मध्ये गंगेच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
तिने ‘देवों के देव महादेव’मध्ये किशोरी सीतेची भूमिका साकारली होती आणि ‘महाराणा प्रताप’मध्ये अजबदे पनवारची भूमिका साकारली होती. रोशनी सात वर्षांची असताना मुंबईत आली होती. तिचे संगोपन तिच्या एकट्या आईने केले आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने तिच्या आयुष्याबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती तिच्या आईशी खूप मैत्रीपूर्ण आहे. ती तिच्याशी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकते.
“मी माझ्या आईशी कधीही खोटे बोलले नाही” : रोशनी वालिया
रोशनी हॉटरफ्लायच्या द मेल फेमिनिस्ट पॉडकास्टमध्ये सांगत होती की, तिची आई तिच्याशी कधीही कडक वागत नव्हती. रोशनी म्हणाली, “मी माझ्या आईशी कधीही खोटं बोलली नाही. मग ते एखाद्या मुलाला भेटायला जाताना असो किंवा त्याला घरी बोलावताना असो. मला वाटते की, स्ट्रिक्ट लोकांची मुलं जास्त बिघडलेली असतात. रोशनी म्हणाली की, तिच्या मैत्रिणी तिच्या आईबरोबर खूप एन्जॉय करतात. ते तिला आंटी म्हणत नाहीत, तर स्वीटी म्हणतात.”
रोशनीला विचारण्यात आले की, ती अशी तीन उदाहरणे देऊ शकते का की, ज्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत की, तिने तिच्या आईला सांगितले असेल. त्यावर रोशनीने उत्तर दिले, ‘माझी आई नेहमीच मला कंडोम वापरायला सांगते. जर तू काहीही केले तरी कंडोम वापर. भारतीय घरांमध्ये ही अजूनही एक नवीन गोष्ट आहे. तिने माझ्या मोठ्या बहिणीला माझ्यापेक्षा जास्त सांगितले. कारण- मी तेव्हा लहान होते आणि आता मी मोठी होत आहे. मी तिला नेहमीच सांगितले आहे.’
रोशनीने सांगितले, “तिची आई तिला सांगते की, ती घरी खूप वेळ राहते, थोडं बाहेर जात जा. तिची आई म्हणते, ‘बाहेर जा, पार्टी कर, मजा कर.’ ती विचारते, तू आज दारू पिऊन आली नाही का? आज तुम्ही सगळे शांत दिसत आहात?” नंतर रोशनीने सांगितले की, ती पंजाबी आहे म्हणून हे सामान्य आहे.
वयाच्या सातव्या वर्षी तिला पहिली जाहिरात मिळाली
रोशनी म्हणाली की, ती जे काही आहे, ते तिच्या आईमुळे आहे. तिने नवीन फोन मला देण्यासाठी तिचे सोने विकले. रोशनी म्हणते की, ती तिच्या मुलांसाठी अलाहाबादहून मुंबईला शिफ्ट झाली. अलाहाबादमधील १००० रुपये म्हणजे मुंबईत १०० रुपयांइतकेच आहेत. इथे खूप खर्च आहे. रोशनी म्हणाली की, तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे. तिची आई तिच्या मुलींसह अलाहाबादहून मुंबईत आली आणि इथे तिचे आयुष्य बदलले. रोशनी सातव्या वर्षी कुटुंबाबरोबर सुटीसाठी मुंबईत आली होती. त्यानंतर तिने एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिले. ती त्याबद्दल सीरियस नव्हती; पण तिची निवड झाली.