scorecardresearch

मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री दिसली बाईक चालवताना, सिग्नलवर असताना लोकांनी ओळखलं अन्…

तिचे बाईक चालवतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर अभिनेत्री दिसली बाईक चालवताना, सिग्नलवर असताना लोकांनी ओळखलं अन्…

बॉलिवूड कलाकार हे बराच वेळा सर्वसामान्यांप्रमाणे रहाण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना तसे जगणे शक्य होत नाही. आता सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा मुंबईतील रस्त्यावर बाईक चालवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

मुंबईत रात्री बाईकवर दिसलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सोनाक्षी सिन्हा आहे. सोनाक्षीने हेलमेट घातले होते, तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे तिला ओळखणे कठीण झाले होते. पण जेव्हा सोनाक्षी सिग्नलला थांबली तेव्हा तिला अनेकांनी पाहिले आणि तिला ओळखले. अनेकांनी तिचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. सोनाक्षीचे वांद्रे येथे बाईक चालवतानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Swara Bhaskar on hijab row: कर्नाटकातील हिजाब वादावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान, सोनाक्षीसोबत जहीर इकबाल देखील बाईकवर असल्याचे दिसत आहे. त्या दोघांचा बाईक चालवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी ‘नोटबुक’ चित्रपटातील अभिनेता जहीर इकबालला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्याच्या वाढदिवशी तिने खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ते दोघे एकत्र फिरताना दिसले होते. आता त्यांचे एकत्र बाईकवर फिरतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या