प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. ‘चंद्रमुखी’ची घोषणा झाल्यापासून ‘ही’ चंद्रमुखी ऊर्फ चंद्रा नक्की कोण असणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी एका आगळ्यावेगळ्या बहारदार रूपात चंद्रा प्रेक्षकांसमोर आली. यावेळी आपल्या मोहमयी नजाकतीने या लावण्यवतीने सर्वांचीच मने जिंकली आणि याला साथ लाभली ती अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची. सध्या सोशल मीडियावर ‘चंद्रा’ या गाण्याच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

अमृता खानविलकर हिने ज्याप्रमाणे ‘चंद्रा’ प्रेक्षकांसमोर सादर केली. त्याला तोड नाही. तिची ही अदा पाहून सामान्य प्रेक्षक तर सोडाच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही ‘चंद्रा’वर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील नुकताच सोशल मिडियावर ‘चंद्रा’चा नृत्य व्हिडिओ शेअर केला असून ‘लावणीच्या प्रेमाखातर’ असे कॅप्शन देत ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
Udayanraje Bhosale
“…तेव्हापासून कॉलर उडवण्याची स्टाईल सुरू झाली”, उदयनराजे भोसलेंनी सांगितला यात्रेतला किस्सा
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च मी करतो, फक्त तुम्ही…”; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर

आणखी वाचा- “मी अशाप्रकारचे चित्रपट…” सोनू निगमनं सांगितलं ‘द कश्मीर फाइल्स’ न पाहण्याचं कारण

सोनाली कुलकर्णी म्हणते, ” लावणीच्या प्रेमाखातर आणि त्याचबरोबर ‘हिरकणी’ टीम विशेषतः प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे यांच्या प्रेमाखातर हा ‘चंद्रा’वर नाचण्याचा मी प्रयत्न केला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.”

आणखी वाचा- घटस्फोट, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अफेअर, प्रेग्नंसी अन्…; मंदानाचा धक्कादायक खुलासा

या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.