दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची देशभरात चर्चा झाली. अगदी बॉलिवूडमधील सेलिब्रेटी ते देशातील वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींनी या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आजही काही लोक असे आहेत ज्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. ज्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमचाही समावेश आहे. पण नुकतीच यावर सोनू निगमनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं हा चित्रपट न पाहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला, ‘मी जेव्हा अशाप्रकारच्या कथा ऐकतो तेव्हा मनातून रडत असतो. ही फक्त काश्मीरचीच गोष्ट नाहीये. मी अशाप्रकारच्या सर्वच अपराधांप्रती संवेदनशील आहे. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. ही संवेदनशीलता फक्त काश्मिरी पंडितांबद्दल नाहीये तर त्या प्रत्येक समजाबद्दल आहे. ज्यांनी अशाप्रकारच्या हिंसाचाराचा सामना केला आहे.’

आणखी वाचा- “अरे गप्प बस…” रणबीर- आलियाच्या लग्नावर शिल्पा शेट्टीची धक्कादायक प्रतिक्रिया

यासोबत सोनू निगमनं अरविंद केजरीवाल यांनी या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी या चित्रपटाबाबत बोलताना, ‘चित्रपटाची कथा खोटी असून हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा युट्यूबवरच अपलोड करावा.’ असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना सोनू निगम म्हणाला, ‘अरविंद केजरीवाल यांची अशी प्रतिक्रिया म्हणजे कश्मिरी पंडितांचा अनादर आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरविंद केजरीवाल यांच्या अशा कमेंटमुळे देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. याशिवाय अभिनेता अनुपम खेर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील त्यांच्या या प्रतिक्रियेला सडेतोड उत्तर दिलं होतं.