मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री सोनाली खरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोनालीने मराठी मालिका, चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ती इथवरच थांबली नाही. तिने डिजिटल विश्वात देखील पदार्पण केलं. ‘अनुराधा’ या वेबसीरिजमध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली. आता सोनालीने नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मातृदिनाच्या निमित्ताने तिने एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती ती स्वतः करणार आहे.

सोनालीने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या प्रॉडक्शन अंतर्गत तिने ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर आधारित आहे. आई-मुलीचं सुंदर नातं दाखवण्याचा प्रयत्न सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे. प्रियांका तन्वर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

आणखी वाचा – Photos : धाकड गर्ल कंगनाचं साडीत खुललं सौंदर्य, मोहक अंदाज पाहून चाहतेही झाले फिदा

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. सोनालीने या चित्रपटाची घोषणा करताच मराठीतील अनेक कलाकारांनी तिच्या नव्या इनिंगसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याबाबत सोनालीने सांगितलं की, “मी निर्मिती केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. मातृदिन हा आपल्या सगळ्यांसाठीच स्पेशल असतो. आईचं एक वेगळं स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या खास दिनी माझा पहिला चित्रपट ‘मायलेक’ची घोषणा करणे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे.”

आणखी वाचा – Mother’s Day 2022 : ‘या’ मराठी सुप्रसिद्ध कलाकारांच्या आई आहेत उत्तम अभिनेत्री, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मायलेक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याचंही सोनालीने सांगितलं आहे. सध्यातरी या चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.