प्रसिद्ध कॉमोडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये वेब सीरिजचे कलाकार सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि रवि किशन यांनी हजेरी लावली होती. यावेळी सोनालीनं रवि किशनसोबत इंटीमेट सीनच्या शूटिंगचा मजेदार किस्सा शेअर केला.

कपिल शर्मा शोमध्ये सोनालीनं, रवि किशनसोबत कशाप्रकारे रोमँटिक सीन शूट केले याचा किस्सा शेअर केला. यावेळी सोनालीनं ‘वेल डन अब्बा’ चित्रपटाविषयी सांगितलं. या चित्रपटात रवि किशन आणि सोनालीनं एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे सोनाली जेव्हा हे सर्व सांगत होती त्यावेळी रवि किशन चक्क लाजत होते. या चित्रपटाचं नाव न घेता सोनाली म्हणाली, ‘मला रविसोबत काम करण्याची संधी मिळत होती. श्याम बाबूंनी विचारलं, ‘एक भूमिका साकारणार का? ’ मी त्यांना होकार दिला. ते पुढे म्हणाले, ‘तू पत्नी असणार आहेस आणि रवि किशन तुझा पती असणार आहे.’ मी म्हटलं ‘ठीक आहे, उत्तम’

सोनाली पुढे म्हणाली, ‘दिग्दर्शकांनी मला त्या सीनबद्दल सांगितलं की, आता तुला रविच्या अंगावर उडी मारायची आहे, बेड तोडून टाक.’ सोनालीचं बोलणं ऐकून रवि किशन चक्क लाजताना पाहायला मिळाले. त्यानंतर सोनाली पुढे म्हणाली, ‘दिग्दर्शकांचं बोलणं ऐकून मलाही खूप लाज वाटत होती. पण रविसोबत काम करताना मी खूप एन्जॉय केलं.’ सोनालीचं बोलणं ऐकून रवि किशन यांनी लाजून आपला चेहराच लपवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘व्हिसलब्लोअर’च्या संपूर्ण टीमसोबत कपिल शर्मानं खूप धम्माल केली. याच एपिसोडमध्ये मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं कपिलला मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलंच सुनावलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि रविकिशन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेबसीरिजची कथा २०१३ साली मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या घोटाळ्यावर आधारित आहे.